१. सभासदांनी किमान रु. १,५००/- चे भाग-भांडवल (शेअर्स) धारण केलेले असावे व ते १०० चे पटीत असावे.
२. सभासदांनी त्यांचे केवायसी अद्यावत असल्याची खात्री करावी, नसल्यास आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता करून केवायसी तात्काळ अद्यावत करून घ्यावी.
३. सभासदांनी त्यांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्यावत करावे.
४. आपला पत्ता / मोबाईल क्रमांक / ई-मेल आयडी अथवा इतर माहिती बदलल्यास तात्काळ बँकेस कळवावे.
५. सभासदांनी त्यांचे वारसदार (नॉमिनी) अवश्य नेमावे.
६. थकीत कर्जदार असलेल्या सभासदांनी थकीत रक्कम भरून आपले कर्जखाते नियमित करून घ्यावे.
७. ३१ मार्च २०२४ अखेर बँकेच्या सांपत्तिक स्थितीची विवरण पत्रके व ऑडिट नोट असलेला ५४ वा वार्षिक सर्वसाधारण अहवाल बँकेचे वेबसाईट वर उपलब्ध करण्यात आला आहे.
अधिक माहिती करीता बँकिंग युनिट, मुख्यालय, भंडारा येथे अथवा खालील नमूद दूरध्वनी / ई-मेल वर संपर्क साधावा : दूरध्वनी क्र. : ०७१८४-२५२३२७,२५३०६३ ई-मेल : bankingunit@bucbl.com